Image 01

Humans of ASGS

Saylee Gaonkar
 I was born in Australia – Sydney and then moved to Adelaide one year later in 1995 as my baba was offered a job here. Growing up as the first generation anywhere is always an interesting situation - the number of Indians here back in the late '90s - early '00s was extremely little compared to what we are lucky to experience now. I grew up with a small group of Indian friends (5 children) whom were the sons and daughters of my parent's friends and at the schools I went to - I was the only Indian.

In Adelaide, until ASG started - the only Ganesh specific functions were poojas at the Lord Ganesha Temple, other people's homes and our home. It was a very courageous step to take for the families that got together 5 years ago with so little resources, support and money to start something like ASG - but who needs money when you have goodwill? Today I stand with my parents, their friends and the ASG family - proud that they have been able to provide an event that allows youngsters to keep in touch with their heritage. My favourite memories of ASG involve watching the performances - seeing my parents perform so carefree makes me so happy that it brings me to tears and watching my Lavani girl's group last year get a call of 'encore' gave me so much joy. I today am able to connect with my heritage through my dancing and give back to my community through my teaching and the amount of happiness this gives me is matched by nothing else.

This year I have become more involved in the organisational side of things and though no doubt I have a lot to learn still and I have probably made some mistakes, I hope that one day I can help take ASG to its greatest potential.

Thank you to the team for being so open and warm and for focusing on what is important - giving OUR kids and OUR community an opportunity to shine - if there is one thing I would like to stress about what I have learnt, is that wherever you go and whatever country you live in - never stop celebrating your heritage - it's the differences between each of our backgrounds and cultures that make us all so interesting and special and we shouldn't forget that. Yes we are Indian first but understanding, appreciating and celebrating each other's own unique backgrounds *together* is what makes us strong. I wish nothing but the best for this year's event and I hope to see all my friends and family at Unley High this weekend.  
Vrushali Damle
 Adelaide Sarvajanik Ganeshotsav is such an amazing initiative by our local community! Being away from India, I would miss Ganpati Bappa and all the celebrations so much! But celebrating this festival has kept me so close to our culture and I am so proud of not only keeping it alive but also teaching and showing it to my 3 year old daughter.

The cultural segment is so rich with talented performances, that are planned and performed by members of our own community! We not only look forward to the actual program but also the practices that take place months before the program. It definitely is a very exciting time of the year for all of us. 
Shruti Ghangurde
 माझी गणेशोत्सवाची आठवण म्हणजे कोकणातील गावचो गणपती.

दर वर्षी गणेश चतुर्थी साठी गावी जाण्याची मजा असायची. हिरव्या गार घाटातून एस टीचा किंवा अलीकडे कोकण रेल्वे चा प्रवास हा अजूनही स्मरणात आहे.

‘गणेश चतुर्थी’ या दोन शब्दांनीच कोकणी माणसाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह भरभरून वाहायला लागतो. इतर प्रांतात गणरायाच्या आगमनाबरोबर सुरू होणारा हा सण कोकणी माणसाच्या मनात तसा पावसाळ्याबरोबरच सुरू होतो.

मालवणीत म्हणूचा झाला तर...

कोकणचो गणेशोत्सव ही काय सांगण्याऐकण्याची नाय तर अनुभवायची गोष्ट असा!!

गणपतीच्या आसनाच्यावर बांधूची "माटी" हिका "माटोळी', "मंडपी' असेही म्हणतात. गावाकडे या माटीक रानात मिळणाऱ्या शेरवडं, हरणे, कांगलां, कवंडाळ, कोकणे, वाघाचे पंजे अशा रानवनस्पती व रानफळांनी सुशोभित केले जाता.
गणपतीच्या आसनाच्या मागील बाजूच्या भिंतीवर कमळे, निसर्गचित्रे, देवांची चित्रे रंगवतात.
सगळ्या अवाठातल्या (वाडीतल्या) मूर्ती आणूचा काम करणारो...पावसाळ्यात निसरडय़ा वाटेवरून मूर्ती आणण्याचे जोखमीचे काम करत रहवता.

चुलीवर केलेलो नैवेज्ञ ... गौरीपुजन......मगे इलो महिलापेशल ओसो !
सुपातली पाना तुळशीसमोर.. नेऊन ठेवा...
(बिरामणाने) भटांने दिलेली सूचना.
व्हळ्यातल्या झिम्मा फुगड्या.
रात्रभर चालणारो अभंग, भजनांचो जागर,
रात्रीची देवळेतली आरती ...
लहान मुलांचो उत्साह ..

ह्या सगळ्या वातावरणात १० दिवस खय जातत कळूचा मार्ग नाय.

बघता बघतां गणरायांची गावाक जाउची तयारी करूची येळ येतां.
गणपती चालले गावाक.. मग त्येंका गाऱ्हाणां घातलां जातां. नवस बोलले जातंत. गाऱ्हाणां घालण्याची पद्धत सुद्धा कोकणातलो सांकृतिक ठेवोच असा.
'गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला’ म्हणणारो चाकरमानी पुन्हा एकदा गावाक राम राम ठोकून मुंबयकडे वळतां तो वर्षभराची ऊर्जा घेऊनच.

‘जावदे पुढच्या वर्षांक काय तरी व्हयाच नाय?’ असां म्हणत जड पायान् घराकडे निघतां.......

ह्या सगळ्या आठवणींना उजाळा देत, अॅडलेड् सार्वजनिक गणेशोत्सवाच्‍या निमित्ताने हा आनंद पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी मला व माझ्या कुटुंबीयांना मिळते.

ह्या कार्यक्रमाची तयारी करताना मी व माझ्या मुलांना पुण्या-मुंबईत किंबहुना कोकणात असल्याचा आभास होतो.

विवीध गुणदरशनाच्या कार्यक्रमाच्या तयारीत आम्ही मागील काही वर्ष इतके रममाण झालो आहोत, की कोकणातील गणेशोत्सव, नाटके किंवा दशावताराच्‍या कार्यक्रमांत लागू तेवढ्याच जय्यत तयारीला ईथे ही लागतो आणी मे महिन्यापासून ह्या सोहळ्याच्या तयारी मध्ये आम्ही सगळेच रमून जातो.

जे मी लहानपणापासून अनुभवले तेच सर्व काही माझ्या लेकी सुद्धा इथे ह्या परदेशात अनुभवतात ह्याचा आनंद अवर्णनीय आहे.

ह्याचे सर्वतोपरी श्रेय अॅडलेड् सार्वजनिक गणेशोत्सवाच्‍या समितीला जाते...

Shruti 
Vrushali Sanap
 Hello all, I believe Ganesh Chaturthi is a festival of utmost significance for all of us.

Every festival was celebrated with great enthusiasm in my family. Ganesh Chaturthi has lots of happy memories from my childhood. Our family used to have a 10 day celebration in our house. We kids used to have decorations like a big mountain with waterfall, duck pond, small plants, lots of greenery and much more, every year. My big brother used to be in charge of this decoration. Twice a day aarti's with different type of Prasad, modak's and other delicacies used to be the attraction point for us as kids. New clothes, mehendi, friends gathering together and visit to our next-door Kaka and Kaku's aarti was my favourite. We used to go and visit other local Ganpati celebrations, attend Marathi plays, songs and orchestra till midnight on weekends.

Attending Adelaide Sarvajanik Ganeshotsav celebration 3 years ago brought back all the memories. I and my family enjoyed the celebrations thoroughly. It was an excellent presentation of team work, positive energy and welcoming attitude by the organisers. This year I have seen the planning, hard work and the enthusiasm by all the ASG Samiti team members, women, kids and specially will have to mention the youth wingof ASG. I feel ASG is doing wonderful job of nurturing this cultural aspect in our kids /new generation's life. This year we are looking forward to celebrate the festival with you all! Let's all celebrate the arrival of our Ganpati Bappa!!!!!!  
Archana Balamuthukrishnan
 Festivals are soul of India and no Indian can remain untouched by the enthusiasm of these festivals. Ganeshotsav is one such festival which is awaited eagerly by old as well as new generation. When I along with my kids first arrived in Adelaide, I told my kids not to expect anything like India over here, be it food or any celebrations specially the festivals. But then I met few Indian families and came to know that we do celebrate festivals here within Indian communities, which was a very big relief. And then I came to know about Adelaide Sarvajanik Ganeshotsav and that it is celebrated with full zest and happiness. Eagerly and happily we became part of it by participating in the cultural programme organised by ASGS. Past two months were amazing when we were preparing our dances for the programme. For kids every Sunday was like the most awaited day now when they can meet all their friends while practicing for their dance. The enthusiasm of all the people participating and organizing the program is fantastic and amazing. It gives us the sense of being in India away from India. Though we will be celebrating Ganeshotsav on 10th /11th of september but the feel of this has been seen in past months of our preparation. A Big applause for the ASGS for organising such a wonderful festival in such wonderful manner - Archana Balamuthukrishnan. 
Sanya Chopra and Barkha Bhandari
 Namaste, this is Sanya and I'm Barkha.. Coincidently we were meant to meet here in Adelaide far away from our hometown, Pune. We both can relate to things, have lots to talk about as said 'it's hard to understand a Punekar unless you're a Punekar yourself'. Since we both come from the same city we share our experiences..During the 10 day long celebrations of Ganesh Chaturthi the whole city of Pune is abuzz with the vigor and energy. There are number of Ganesh mandals around the city that leave no stone unturned in ensuring a grand celebration with beautiful idols of Lord Ganesha, loud music, spectacular/ innovative stages, and amazing lighting effects and not to forget the delicious modak served as prashad. As kids 'mandal hopping' with family was an annual affair for us and we both used to look forward to visiting all these beautiful mandals around the city. We’d choose one area of the city every day and head out to explore the themes and idols. The rhythm of the Dhol Tasha and other performances filled our hearts and minds with the festive spirit. During these 10 days the whole city is soaked into the vibrance and enthusiasm of this festive. We hope that our family and friends can come to watch our performance at the Adelaide Sarvajanik Ganeshotsav!  
Ketki and Ashwin Joshi
 माझी लहानपणापासूनची गणपतीची आठवण म्हणजे आमच्या घराचा पार्ल्याला (मुंबई) ला वर्षानुवर्षे साजरा गेला जाणारा पाच दिवसाचा गणेशोत्सव. साधारण जुलै महिन्यात आईच वाक्य कानावर पडायचं, गणपती जवळ आले आता तयारी ला लागायला हवं. ज्या वयात आपल्याला काळ वेळ तारीख वार ह्याची काळजी नसते त्या वयात हे वाक्य ऐकलं कि आपोआप समजायचं कि गणपती आता थोड्याच दिवसात येणार. मग मी आणि माझा भाऊ गणपती सिलेक्ट करायला कधी जायचं असाबाबांकडे तगादा लावायचो. आमचे बाबा त्यावेळी आम्हाला गम्मत वाटावी म्हणून आम्हाला विचारून गणपतीची मूर्ती सिलेक्ट करीत असत आणि आम्ही दरवर्षी वेगळी मूर्ती घेत असू. कधी कमळात बसलेला तर कधी सिंहासनावर, कधी गायीला टेकून असणारा तर कधी मांडी घालून बसलेला अश्या मुर्त्या आम्ही घरी आणायचो.

लोकप्रिय आणि मागणी असलेल्या मुर्त्या आधीच बुक होऊ नयेत ह्यासाठी आम्ही एक महिना आधी गणपती बुक करायचो आणि दर चार दिवसांनी आई बाबांकडे भुणभुण करायचो कि गणपती कधी येणार, किती दिवस राहिले. मग अति झालं कि मग आई चिडायची आणि लाडिक रागाने म्हणायची आता एक फटका देईन हां सारखं विचारलास तर! पण आईने ह्या कारणासाठी काय किंवा अभ्यासासाठी काय, फटका कधीच दिला नाही. काही दिवसांनी मग आई हळू तयारी ला लागायची. बाजारातून जिन्नस आण, वाण्याकडून हे घेऊन ते घेऊन ये अश्या ऑर्डर्स सोडायची. मग मी हळूच कधीतरी भावाला सांगायचो कि आईने तुला जिन्नस आणायला सांगितलेत पण मोठाच भाऊ तो त्याला लगेच लक्षात यायचा माझा डाव मग तो आईला सांगायचा आणि मग अश्यावेळी ते काम पुन्हा माझ्याच गळ्यात पडायचं.

गणपती एक दोन आठवड्यावर आले कि घरात स्वादिष्ट पदार्थांचे वास सुटायला लागायचे. गणपतीला काही दिवसांचा अवकाश असतांना आमच्याकडे माझ्या आत्या आणि मावश्या येऊन राहायच्या आणि गणपतीच्या एक दोन दिवस आधी पुण्याची भावंडे यायची मग काय आमच्या आनंदाला उधाण यायचं कारण आम्हाला समवयस्क असे आमचे भाऊ आणि बहिणी आल्यावर तेव्हांच मग आमच्या साठी खऱ्या अर्थाने तो गणेशोत्सव सुरु व्हायचा. मग त्यांच्याबरोबर गणपतीचे मखर तयार करणे, गणपतीसाठी आरास आणि सजावट करणे, भरपूर गप्पा आणि गाणी म्हणणे आणि एकंदर धमाल करणे असे करत पाच दिवस कधी जायचे कळायचेच नाहीत. गणेशोत्सवातली गम्मत म्हणजे गणपती साठी केलेला मोदकांचा नैवेद्य आणि जोडीला निवग्र्या. मोदकांवर साजूक तूप आणि निवग्र्यांवर कच्चे तेल घालून खाण्याचा आनंद काही और असायचा. दुसरी गणपती मधली मजा म्हणजे आरत्या. त्यावेळी आरती ला आमच्या सोसायटीतले झाडून सगळे यायचे साधारण ५०-६० लोक जमायची आणि मग अशी जोरदार आरती व्हायची कि काही विचारू नका. हल्ली व्हाट्सएप्प ग्रुपवर जे जोक्स आरत्यांबद्दल येतात तसाच घडायचं. दास रामाचा वाट पाहे साजणा! फळीवर वंदना! असा काहीतरी म्हणून मग आम्ही भावंडं एकमेकांकडे बघून हसत राहायचो. येई हो विठ्ठले ची आरती एवढी लांबवयचो कि दमछाक व्हायची आणि मग घरातल्या बायका नंतर तक्रार करायच्या.

असे एक ना अनेक बरेच किस्से आहेत ते सगळे सांगणे शक्य नाही परंतु ह्या सगळ्यातून एकाच आवर्जून सांगावेसे वाटते हल्ली टेकनॉलॉजि एवढी प्रगत झाली आहे की आपण एकमेकांशी बोलायला आपल्या भावना व्यक्त करायला जास्तीत जास्त त्याचा आधार घेतो परंतु त्यावेळी ही टेकनॉलॉजि एवढी प्रगत नव्हती परंतु तरीही आम्हाला आमचे लहानपण कधीही बोरिंग वाटले नाही. कारण खेळायची साधने म्हणजे जास्तीत जास्त बाहेर खेळणे आणि इतर माणसांशी मुखवटे न घालता मनापासून संवाद साधणे आणि दिवस आनंदात घालवणे असे होते. कधीतरी थोडी खंत वाटते की आम्ही जे दिवस अनुभवले ते आमच्या हल्लीच्या मुलांना मिळत नाहीत त्यातुन आपण परदेशात त्यामुळे संस्कृतिशी नाळ जुळण्याच्या संधी कमी अश्या परिस्थितीत अडलेड सार्वजनिक गणेशोत्सव हा गेले पाच वर्ष अत्यंत यशस्वीपणे साजरा केला जातो, अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात, परदेशी संस्कृतीत वाढत असलेल्या आपल्या मुलांना आपली अतिशय उच्च अशी संस्कृती कळते, मुलांवर नकळत ते संस्कार होतात, त्यांना स्वतःचे कलागुण दाखवण्याची संधी मिळते आणि सगळ्या मोठ्या माणसांना तिकडच्या आठवणींचा वारसा पुढे नेता येतो. हि खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. अडलेड सार्वजनिक गणेशोत्सव समिती करत असलेल्या ह्या कामाची प्रशंसा करावी तितकी थोडी आहे. अश्या ह्या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाला माझ्या, केतकी आणि आर्यन च्या मनापासून शुभेच्छा.  
Amol and Sheetal Jaywant
 गणपती बापा मोरया..... मंगल मूर्ती मोरया..... काय प्रचंड ऊर्जा आहे हे म्हणण्यात नाही का.... गणेश उत्सव हा तर माझ्या मते सगळ्यांच्या प्रचंड जिव्हाळ्याचा विषय / उत्सव.... प्रत्येक जण अतिशय आतुरतेने वाट बघत असतो आपल्या बाप्पाची आणि गणेश उत्सवाची.... सगळ्यांच्याच लाख मोलाच्या आठवणी असतात ह्या आपल्या प्रिय सणा बद्दल...., आमची एकत्र कुटुंब पद्धत आहे. पूर्वी माझे बाबा आणि सगळे काका एकात राहायचे. पुण्यातील शुक्रवार पेठे मध्ये एकत्र वाडा पद्धती होती, आजू बाजूला दगडूशेट, मंडई सारखे नावाजलेले गणेश मंडळे असत. त्या मुळे गणेश उत्सवा मध्ये घरी आणि दारी जे कधी वातावरण असे त्याची कल्पना तुम्ही करू शकता.

आमचा परिवार खूप मोठा अगदी घरची माणसे मोजली तरी ६० / ७० माणसे असत. नंतर जस जसे प्रत्येकाचे प्रपंच वाढले आणि काम निमित्ताने बरेच जण वेगळीकडे स्थायिक झाले. पण गणपती उत्सवामध्ये आवर्जून सर्व परिवार आजही एकत्र येतो अगदी आता ह्या वेळी सुद्धा तिकडे भारतात / पुण्यात सगळे एकत्र जमलेत आणि आमचा ५ दिवसाचा गणेश उत्सव साजरा करतायत.

जितक्या आठवणी सांगाव्यात तितक्या थोड्या.... पुण्यात आमच्या सोसायटी मध्ये गणपती उत्सव असे आणि विविध कार्यक्रम साठी पूर्ण परिसरात एकदम फेमस, साधारण जुलै महिन्या पासून आमची गडबड सुरु व्हायची, मिटींग्स, वर्गणी च्या सर्वांना जबाबदाऱ्या देण्यात यायच्या, आमच्या गणेश उत्सवाची खासियत म्हणजे आमची तीन अंकी नाटके.... होय अतिशय कलाकारंनी भरलेली सोसायटी होती आमची. अगदी मोरूची मावशी सारखी उत्तम नाटके सुद्धा आम्ही बसवायचो, प्रचंड छान कलाकार, डायरेक्टर्स आणि नेपथ्य. अगदी छोट्याश्या जागे मध्ये अतिशय अप्रतिम सेट बसवायचो आणि एक्दम दर्जेदार कला कृती सादर व्हायची.... आणि ह्या सगळ्या साठी २ / ३ महिने आधी पासून रोज रात्री प्रॅक्टिस आणि मग काय जे वातावरण तयार व्हायचे कि त्याचा हँगओव्हर अगदी उत्सव नंतर सुद्धा महिनाभर राहायचा.

आम्ही जेव्हा अडेलैडे ला साधारण सहा वर्ष पूर्वी आलो तेव्हा सगळेच सण मिस करत होतो, पाच वर्षा पूर्वी सार्वजनिक गणेश उत्सव समितीने जेव्हा आपला लाडका गणेश उत्सव साजरा करायला सुरुवात केली तेव्हा जिवात जीव आला, जे वातावरण आम्ही आमच्या लहानपणी अनुभवले ते साता समुद्रापार सुद्धा अनुभवायला मिळणे हे भाग्यच म्हटले पाहिजे, आपल्या मुलांसाठी तर हि तर एक प्रकारची पर्वणीच आहे.

अडेलैडे सार्वजनिक गणेश उत्सवाची तयारी सुद्धा त्याच पद्धती प्रमाणे साधारण गणेश उत्सवा आधी दोन महिने चालू होते आणि आपल्या घरचे कार्य असल्या सारखे ज्याला जसे जमेल तसे ते उत्साहात कामाला लागतात. दर आठवड्याला विविध गुणदर्शनाची तालीम लहानांपासून मोठ्या पर्यंत अतिशय उत्साहात सुरु होते. हे सगळे बघताना, अनुभवताना लहानपणीच काळ आठवल्या शिवाय राहवत नाही. आनंद वाटतो कि तसाच अनुभव आपल्या लाडक्या इथल्या उत्सवा मुळे आपली मुले सुद्धा त्याच उत्साहात अनुभवतायत आणि ह्या साठी सार्वजनिक गणेश उत्सव समितीचे कौतुक करावेसे वाटते.

आज आपल्या पाचव्या गणेश उत्सवाचा अदला दिवस, आज पुण्यातली गडबड आठवते. सगळी बाजारपेठ गर्दीने भरलेली असे. फुले, तोरण, आरसीचे सामान, केवडा, कमळ, गुलाब, शमी, दुर्वा इत्यादी गोष्टीने बाजारपेठ खचाखच भरलेली असायची, ह्याच्या जोडीला चितळ्यांचे माव्याचे मोदक घेण्या साठी भली मोठी रांग असायची. भोरी आळी मध्ये सुद्धा डेकोरेशन चे सामान घ्या साठी चेंगरा चेंगरी होत असे आणि ह्या सगळ्या गोष्टीने भरलेली पिशवी घेऊन घरी पोचताच सुरु व्हायची तयारी आमच्या सोसायटी च्या गणेश उत्सवाचा मांडव घालण्याची, घरची आरास तर दोन आठवडे आधीच तयार असायची.

आमची सोसायटी फक्त बारा कुटुंबाची छोटी सोसायटी होती पण ती आजकाल सारखी नसून एक चाळ किंवा वाडया सारखी होती, सगळी घरे एका कुटुंबा सारखी होती. उत्सवा च्या आदल्या दिवशी तर सगळ्या घराची दारे सताड उघडी असत आणि मग काय ज्याला जे कमी पडेल ते कोणीही कुठल्याहि घरात जाऊन बिनधास्त आणत असत, रात्री पर्यंत संपूर्ण मांडव सजवून व्हायचा आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी.

मग उत्सवाच्या पाच दिवसात नाटक, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, खेळ, जादूचे प्रयोग असे नाना प्रकारचे प्रयोग असायचे. पाच दिवस कसे पटकन जायचे कळायचे सुद्धा नाही आणि मग विसर्जनाच्या दिवशी सांगता व्हायची आमच्या लाडक्या ढोल ताशाच्या गजरात.... गणपती उत्सव आणि ढोल ताशा हे एक अतूट नाते आहे नाही का.... ढोल ताशांचा गजर नसेल तर उत्सवाला पूर्णत्व वाटत नाही आणि आल्या सार्वजनिक उत्सवात हि कमतरता सुद्धा वाटत नाही आणि ह्याचे श्रेय जाते आपल्या शिवगर्जना ढोल ताशा पथकाला!!!!

इथल्या बिझी शेड्युल मधून सर्वजण जेव्हा वेळ काढून एकत्र येतात, दोन दोन महिने मुलांसाठी, स्वतः साठी वेळ काढतात आणि गणपतीचे दोन दिवस आनंदात घालवतात तेव्हा पुन्हा जुने दिवस अनुभवल्याचा आभास होतो.

विसर्जना नंतर दमून आल्यानंतर कार्यक्रम असायचा सहभोजनाचा, सोसायटी मधील सर्व लेडीज मिळून सुंदर जेवण बनवायच्या आणि आम्ही सगळे एकत्र बसून जेवायचो, नंतर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम व्हायचा आणि कार्यक्रमाची सांगता हौसी (बिंगो) ह्या खेळाने व्हायची. काय दिवस होते ते..... लहान पणीच काळ सुखाचा.....

ह्या सर्व गोष्टीची कमतरता आपल्या अडेलैडे सार्वजनिक उत्सवात कायमच भरून निघते आणि आपल्याला पुढील वर्षभरासाठी ऊर्जा मिळते. हा सोहळा सलग पाच वर्ष चालू ठेवल्या बद्दल आम्हा सर्वांकडून अडेलैडे सार्वजनिक समितीचे त्रिवार अभिवादन. हा उत्सव, हा सोहळा असाच भरभरूदे आणि येणारी पुढील वर्षे आलप्या देशा पासून लांब असलेल्या सर्व बांधवाना असाच निखळ आनंद देत राहूदे हीच प्रार्थना.

हे सगळे अनुभव परत एकदा घेण्याची वेळ अगदी जवळ आलीय.... आजसुद्धा आपल्या गणेश उत्सवाचा अदला दिवस.... पुन्हा तीच तयारी, तोच उत्साह, तीच लगबग, तीच आतुरता आणि अनेक नवीन कार्यक्रमांची मोठी पोटली घेऊन येत आहे उद्याचा दिवस..... चला तर मग भेटूया लवकरच...... उद्याच.... आणि परत एकदा उजाळा देऊ आपल्या प्रत्येकाच्या आठवनींना, प्रोत्साहनदेऊ आपल्या लहानग्यांना आणि भेटू पुन्हा एकदा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या उत्सवात....

गणपती बाप्पा मोरया........ मंगल मूर्ती मोरया.......... ?? ??  
Shivani Valunj
 When we first started celebrating Ganeshotav in Adelaide, I was happy that we could bring a little bit of India into Australia and celebrate the joy of the Indian culture. It is the main event that I look forward to every year. It brings our community close together and celebrate it in the Indian way with the pooja, the loud dhol and of course modaks. 
Snehal Gorey
 Some memories are so emotive that they offer a constant source of positive energy. Such is the memory of 'Gauri Ganpati ' from my childhood. Along with ukadiche modak (sweet dim sims made of rice flour coating and coconut and jaggery filling....drool!), panchyakhadya (5 dry fruit mix), phulanchee anee divyanchi Aaraas (fresh flower and oil lamp decorations), various cultural entertainment programs and festive spirit in the air there are 2 special memories closest to my heart. All my cousins and I used to pick fresh "Gulabakshi" (Mirabilis or four o 'clock ) flowers from my grandparents' back garden in evening and then Ajji (my grandma ) used to carefully take the calyx of each flower out while she taught us how to make beautiful garlands. Ajji made these garlands with ease and grace weaving the stalks of Gulabakshi flowers together. I have this special connection with Bappa and Gulabakshi flowers as it instantly connects me to my dear Ajji. When it was time for Gauris to arrive my mum used to draw beautiful rangoli symbolising Gauri's two feet all over the house and then Ajji used to welcome Gauris inside by saying, " Gauri Aalya Gauri ! Kashachya paulani ?" ( Goddess Gauri is here and what is she bringing with her ? ) and we all cheered , " sonya rupyacha paulanni" ( she's bringing health, wealth and happiness)!! ASG is all about reliving these memories and being grateful for them. It's about being able to give your children and the younger generation a slice of this rich heritage in a land away from your homeland. 
Little Champs
  
Shubhangi Desai
 We both have Ganpati and Gauri at our homes back in India. Our every year rituals would be visiting friend’s places for aarti, late night drives to see Lalbaugh cha Raja and witnessing seeing the sea of people on the Mumbai roads shouting "Lalbaugh Cha Raja cha vijay aso". Mumbai has it’s own charm during this festival. Even while you sit in your house you can hear the aarti being performed at someone else’s home in the neighbourhood. The sound of loud speakers playing music, glittering lights on the streets of every Sarvajanik Ganesh Mandal, and the mood in the markets a day before festival starts is something that every Maharashtrian can relate to. Last year was the first year we were out of India during Ganesh Chaturthi. And last year was our first year of participating in ASG. It was the first time ever I had danced in a nauvari saree on stage. I guess this is the time of year which everyone here waits for when you can dress up and enjoy the Ganesh Chaturthi festival. I like the fact that ASG has kept the notion of Sarvajanik Ganesh Utsav intact so that the new generation never misses out on our beautiful Indian culture in a foreign land. Looking forward to this year's event. 
Minoti Paranjpe
 माझे बालपण मुंबई आणि पुणे येथे गेल्यामुळे गणपती उत्सव म्हंटले की माझ्या डोळ्यासमोर येतो तो आमच्या सोसायटी मधला सार्वजनिक स्वरूपातील गणपती. गणपती उत्सवाची तयारी ही तशी गणेश आगमनाच्या २ महिन्यापूर्वीच चालू होत असे आणि आजही तीच परंपरा चालू आहे. आमच्या सोसायटीत गणेशोत्सव ५ दिवस साजरा केला जायचा. सोसायटीत मांडव पडल्यापासून ते कार्यक्रम सादरीकरणापर्यंत सर्वजण घरचे कार्य असल्याप्रमाणे तयारीला लागत . ह्या उत्सवात सर्व वयोगातील (लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक) लोकांचा सहभाग असे. या उत्साही कलाकारांचा सहभाग प्रामुख्याने गायन , नृत्य आणि शेवटच्या दिवशी नाटकाच्या सादरीकरणात असायचा. चौसष्ठ कलांची देवता असणाऱ्या गणरायाला स्मरून सर्वजण तयारीला लागत. काळानुरूप काही बदल होत गेले जसे की रंगमंचावरील सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचे नेहमीच कौतुक होते परंतु पडद्यामागील काम करणाऱ्या किमयागार जसे की संहिता लिहिणारा लेखक, देखावे उभारणारा नेपथ्यकार, नृत्य दिग्दर्शक, वाद्यवृंदतील कलाकार ह्यांची दखलही आता घेतली जात आहे. सोसायटीच्या या सार्वजनिक गणपती उत्सवात तीन पिढ्या एकत्र नांदताना दिसतात. आजी तिचा नातू रंगमंचावर दिसल्यावर त्याचे कौतुक करते त्याचबरोबर नातूही आजीला रंगमंचावर बघायला उत्सुक असतो.

आपल्या मायभूमीपासून दूर आल्यावर सणासुदींच्या काळात आपल्याला ह्या उत्सवांची तीव्र जाणीव होते परंतु ही उणीव गेल्या पाच वर्षांपासून 'Adelaide सार्वजनिक गणेशोत्सव' त्यांच्या नियोजनात्मक कार्यक्रमातून भरून काढत आहे. ते आयोजित करीत असलेल्या दोन दिवसांच्या उत्सवात इथल्या स्थानिक कलाकारांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो. Adelaide सार्वजनिक गणेशोत्सवास उत्तरोत्तर यश मिळो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.

"गणपती बाप्पा मोरया"  
Young Humans of ASG
  
Aniket Jagtap
 Lord Ganesha is one of the most loved deities in the Hindu pantheon of gods and Ganesh Utsav means Bappa’s (Lord Ganesha) arrival to stay amongst the people for 10 days. Being from Maharashtra, Ganesh Utsav has a special place in my heart. Whole ambience is filled with energy and happiness with Lord Ganesha’s arrival. In Nashik, we welcome Lord Ganesha on the beats of Dhol-Tasha followed by Lejim Pathak which is famous as Nashik Dhol all around Maharashtra. Ganesh Mandal are the integral part of this festival where people from all age groups, especially youth work rigorously to make their Bappa look beautiful by means of stunning decorations. I remember how enthusiastically we use to work and organises cultural events for our Ganesh Mandal. Ganesh Festival is the best example of communal integrity in India as it is celebrated by every community irrespective of their religion. I have been away from home and family for last 3 years for studies and missed Ganesh Utsav during this time. But last year I visit Adelaide Sarvajanik Ganeshostav (ASG) in Adelaide and I felt like I am back home. I was pleased to see that people in Adelaide are celebrating it the way we used to celebrate in India and at the same time they are including that sense of Indian culture in youth generation here. After last year I decided to be a part of ASG multi-cultural event and here I am today, proudly a member of this Adelaide Sarvajanik Ganeshotav family. Thank you to ASG family and looking forward to become a part of this tradition in Adelaide. 
Kalindi Chirmule
 In my family, we had a very short Ganapati festival at home. Only one and a half day. But other families in our Wada used to have five days celebration. Everybody used to participate in all the activities as if we were all living in the Wada like one big joint family. Five years ago, when Marathi Adelaideans decided to celebrate Ganeshotsav on a community level, Dilip and I were really happy. We were happier right from the first day five years ago and every year afterwards and look forward for the next. It's such a pleasure to see people's enthusiasm, willingness to undertake duties and fulfilling them to their best, sharing and caring. Men and women dressed in their best traditional Marathi costumes and jewellery. Girls wearing Parkar- Polka, sarees and boys in Salwar- Kudata shows that they want to make up for what they are missing being away from their homeland. Hidden talents of new and old Adelaideans emerge and make enjoyable two days cultural events.

And believe me it is not only two days event, it starts probably a month after last year's celebration. Two months prior to the date, is a big hassle- bustle. Programs, practices, costumes, menus - a few to say. People meet often and regularly to make the event successful, newly arrived people get a chance to meet settled ones and new friendships are formed. It is a great community event, well organized and enjoyed by all. Dilip and I appreciate the hard work, long hours, physical and mental efforts put in by the committee members and their spouses. Adelaide Sarvajanik Ganeshotsav Samiti is doing a wonderful job. Keep it up.  
Anup and Madhura Deshmukh
 गणेशोत्सव म्हणलं की पुण्यामध्ये सर्वत्र उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण असते. मला आठवतंय लहानपणी आम्ही सर्व मित्रमंडळी गणेशोत्सव जवळ आला की सोसायटीमध्ये प्रत्येकाकडे वर्गणी मागायला जायचो. काहीजण स्वईच्छेने रु.२५१/- द्यायचे तर काहीजण रु.२५/- द्यायला पण घासाघीस करायचे. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आम्ही सर्व मित्र मांडवात रात्री २-३ वाजेपर्यंत सजावट करायचो व गणेश चतुर्थीला ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांचे स्वागत करायचो. आमच्या घरी गणपती बसवायची प्रथा नाही परंतु माझ्या मामाकडे दिड दिवसाचा गणपती असतो त्यामुळे बाप्पासाठी २१ उकडीच्या मोदकांचा नैवेद्य जरुर असे. मला उकडीचे मोदक खुप आवडतात व त्यामुळे आईला जरा जास्तच करायला लागायचे. आता माझ्या बायकोच्या म्हणजेच मधुराच्या घरी पण ५ दिवसाचा गणपती व २ उभ्या गौरी बसतात. ती देखील लग्न होईपर्यंत दरवर्षी तिच्या बाबांना गौरी-गणपतींची आरास करायला मदत करत असे.

गणेशोत्सवाचे वेध तर आम्हाला ३ महिने आगोदरच लागायचे, त्याचे कारण म्हणजे ढोल-ताशाची प्रॅक्टीस... ३ महिने दररोज न चुकता सायंकाळी ६ ते ९ वाजता ढोल-ताशाच्या प्रॅक्टीसला जायचो. दिवसभर कामामुळे आलेला थकवा संध्याकाळी ढोल वाजवल्यावर निघून जायचा. आमच्या शिवगर्जना पथकात वय वर्ष ५ ते ७५ या वयोगटातील तरूण-तरूणी ढोल-ताशा वाजवायला यायचे. आमचा एक जरी ठोका चुकला किंवा एक जरी ताशाची काडी कमी किंवा जास्त वाजली तर आमचे सर आम्हाला खुप ओरडायचे व वेळ प्रसंगी मारायचे देखील. पुण्याच्या मानाच्या तिसऱ्या म्हणजेच गुरूजी तालीम मित्र मंडळाच्या तसेच अखिल मंडई मित्र मंडळाच्या मिरवणुकीत आमचे पथक वादन करीत असे. पुण्यात १० दिवस वेगवेगळ्या ठिकाणांहून लोक गणपतींचे देखावे बघायला गर्दी करत असत. मुख्यत: हिराबाग मित्र मंडळ, हत्ती गणपती, खजिना विहीर, राजाराम मित्र मंडळ, चिमण्या गणपती, दगडूशेठ मित्र मंडळ व अखिल मंडई मित्र मंडळ इत्यादी मंडळांचे देखावे रमणीय असत. दरवर्षी आम्ही पहाटे दगडूशेठ मित्र मंडळापुढे सहस्त्रावर्तनासाठी जात होतो. पुणे शहर पोलिसांची तर या १० दिवसात खुपच तारंबळ उडते, दहा ही दिवस कामावर असल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना त्यांच्या परिवारासोबत गणेशोत्सव साजरा करताच येत नाही.

मी आॅक्टोबर २०११ साली पुणं सोडलं आणि अॅडलैडमध्ये स्थायिक झालो. मी ऐकलं होतं, इथे गणेश चतुर्थीला देवळात गणेशोत्सव साजरा करतात पण बिना मिरवणूक व ढोल-ताशाचा. गेली १२-१३ वर्षे पुण्यात गणेशोत्सवात दरवर्षी ढोल वाजवत असल्यामुळे २०१२ साली मी गणेशोत्सवात सिडनीला गेलो. निमित्त होतं ते म्हणजे ढोल वाजवायला मिळेल, कारण सिडनीमध्ये शिवगर्जनेची दुसरी शाखा आहे हे मला माहिती होतं. सिडनीमध्ये ढोल वाजवल्यानंतर माझ्या मनात आलं की आपण पण ॲडलैडमध्येही शिवगर्जनेची शाखा सुरू करू शकतो. व ॲडलैडमधल्या काही सहकार्यांच्या मदतीने आम्ही शिवगर्जनेची तिसरी शाखा सुरूही केली.

मला व माझ्या बायकोला ढोल-ताशाची आवड असल्यामुळे आम्ही दोघंही नवीन-नवीन ताल बसवायला लागलो व आम्हाला विशेष प्रोत्साहन दिलं ते श्री. सुशील हेगिश्ते यांनी. व २०१३ सालापासून आम्ही मंदिरात गणेशोत्सव मिरवणूक व ढोल-ताशांच्या गजरात साजरा करू लागलो.

त्याचप्रमाणे २०१२ साली काही मराठी बांधवांनी एकत्र येऊन ॲडलैड सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली. यंदाचे ह्या समितीचे हे पाचवे वर्ष आहे. पहिल्या वर्षी १५० लोक ह्या गणेशोत्सवात सहभागी झाले होते तर यंदाच्या वर्षी १५०० पेक्षा जास्त लोक या गणेशोत्सवात सहभागी होतील अशी आशा आहे. या सार्वजनिक गणेशोत्सवात फक्त मराठीच नाही तर इतर समाजातील लोकही सहभागी होतात. ॲडलैड सार्वजनिक समिती दरवर्षी गणेशोत्सवात चांगले सांस्कृतिक कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असते. त्याचप्रमाणे तरूण पिढीला आपल्या संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. दरवर्षी ही समिती भारतामध्ये गोर-गरीबांना तसेच अपंग अथवा अनाथ मुलामुलींना आर्थिक मदत देखील करते. त्यांच्या ह्या कार्याबद्दल संपुर्ण समितीला सलाम...

चला तर मग ॲडलैडकर ह्या वर्षीदेखील १० व ११ सप्टेंबर रोजी George Creswell Hall, Unley High School येथे आपण सर्वजण हा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करूया...

गणपती बाप्पा मोरया!!!  
Dr. Preetam Ganu with her daughters
 When I first attended Adelaide Sarvajanik Ganeshotstav, for a short while, 5 years back,my eyes just welled up and I started crying. It's so difficult to explain riot of emotions in my mind. But it was something so close and deep in my heart which I missed in last 10-15 years when I was busy with studying medicine and work and life. It took me back to nostalgic memories of my childhood days of pure joy. Time, when I enjoyed all traditions without knowing about our rich heritage.

I come from a small town in western Maharashtra, Karad which is situated at banks of river Krishna and Koyana. We used to celebrate all festivals with zest and enthusiasm. Almost months before Ganeshotstav, kumbharwada (a place where traditional pottery business of making Ganapati Idols takes place) was busy creating thousands of beautiful Ganapati idols and all different shapes and colours. In our family, we always choose idol looking like famous Dagadusheth Halwai Ganapati from the same place every year. Idol used to be booked a few days before. Next was the preparation for decoration, me and my sisters and cousins used to brainstorm for new ideas to make decorations and put our all art and technology skills to test. A day before Ganesh Chaturthi, is worshipped as Haritalika, where all ladies used to worship Lord Shiva, keep fast and pray for a good husband. On the day of Ganapati arrival, my mum and aunt used to be busy with preparing delicious food, specially Ukadiche Modak (steamed rice floor and jaggery dish) We would collect flowers from our garden,all different types of leaves, make different garlands. Brining Ganapati idol to home is celebrated with shouting like ' Ganapati Bappa Morya." Then different rituals, which really means getting life in idol are performed.We all children loved Arati, singing songs of God's praise with clapping. We have Ganapati for 5 days in our house and we used to do Arati and Puja in the morning and evening with special khirapat (food) each day. All my friends used to be interested into finding out each other's decorations and we used to visit almost all houses in our colony for Arati. After 5 days, it's a sad time when we used to bid adieu to our special guest in river Krishna,with promise to see Him next year again.

But, after the 5th day, focus used to be more on Sarvajanik Ganeshotstav, where colourful pandals with different decorations and themes were set on almost every road and every junction. Sarvajanik means celebrated as a community. We used to love watching different mythological stories played with wooden characters and music, sitting on my Dad's shoulders in a tremendous crowd. Ganeshotstav used to be in the air, the decorations,Idols, competitions, Music, Flowers, stories, food,shopping, everywhere.

As I grew older, I celebrated Ganeshotstav in school, college, in the temple as Sarvajanik Ganeshotstav or sometimes just for myself,in my mind. In a country of a billion people with 33 million different Gods, Ganesha is considered as the remover of all obstacles and always worshipped first. I always had that feeling, experience and blessings. Yet, when you are moved to your new adopted country, you try to look at all traditions in more scientific way. Time, significance, convenience, priorities all different things play in your mind.

But when I attended Adelaide Sarvajanik Ganeshotstav, I was amazed at hard work and dedication, but more than that,I was surprised with the participation of the young generation. After many years, I felt same enthusiasm and I realised our rich heritage. Public or community celebration of Ganeshotstav was started about 100 years back, by Lokmanya Tilak, to get people together and I am happy to say that Adelaide Sarvajanik Ganeshotsav and Shivgarjana band are doing it again. Watering our roots is important to grow, even in the different land!  
Pooja and Abhiman Sawant
 Nostalgia kicks in every time I think of Ganesh Utsav and I get submerged in memories from childhood and back home. Although we didn't really bring Ganpati Bappa home, the entire neighborhood transformed into our own. Going around looking for the right durva, hopping from one place to another for aartis 5 times a day, making modaks and eating them without the worry of putting on weight became a ritual for 10 days.

When we landed in Australia in the March of 2016, we left all that and a lot more far behind. While we landed with dreams and positivity, our first 2 months ended up being pretty depressing, lonely and negative because we fell in wrong hands. Immigration initially is almost like uprooting yourself into a foreign land, trying to branch out into a new world.

But, up there someone was watching and I bumped into Vrushali and Madhuri at the Marion Mall. She referred me to Neeta Tai and through her, I met this bunch of fun, determined and creative ladies who I decided to shake a leg with. From there to all of us super enthusiastic about our performances, we look forward to our weekends of practice. We have branched out and we are finding our roots yet again.

Thank you Adelaide Sarvajanik Ganesh Utsav Samiti for accepting us. We can't wait for you to come; Ganpati Bappa Morya!!! 
Bhuskute Family
 येतो येतो म्हणता म्हणता ASGS चा सार्वजनिक गणेशोत्सव काही तासांवर येऊन ठेपला आणि मला माझ्या गावची तीव्र आठवण आली. विशेषतः माझ्या लहानपणीची. आमचे भाड्याच असलं तरी केव्हढ तरी प्रचंड घर होतं, पुढे मागे अंगण, मग पडवी, ओटी, माजघर, स्वयंपाक घर आणि बाप्पा साठी स्वतंत्र देवघर होतं. मागे मोठे परसाव, विविध फळ आणि फुलझाड होती. आम्ही कधीच फुलं, केळी, काकड्या, पडवळ, भेंडी ह्या गोष्टी विकत आणलेल्या आठवत नाहीत. आई बाबा आणि आम्हा मुलांच्या हौशी मेहनतीची फुलं आणि फळ घरातच पिकायची . आमचे घर अगदी डोंगर पायथ्याशी होतं. त्यामुळे गणपतीत सगळीकडे हिरवे गार अन धुक्यात डोंगर असं प्रसन्न वातावरण असायचे. सोनचाफा आणि लाकडी चाफा ह्या सारखी फुलं शेजारीच असलेल्या माझ्या मामाच्या नारळ सुपारीच्या बागेत मिळायची.

गणपतीची आरास करायला तेव्हा विद्युत रोशणाई नसायची. निसर्गरम्य गावात निसर्गरम्य आरास असा प्रकार होता. बाप्पा समोर आई गोडेतेलाची समई आणि साजुक तुपाचे निरांजन अखंड तेवत ठेवायची तर बाहेर आम्ही मुले कडू तेलाच्या पणत्या लावायचो..अगदी दिवाळी असल्यासारखी. आरास म्हणुन देवासमोर विविध प्रकारची औषधी फळ टांगायची, त्यात कवंडल, बेल आणि एक लाल बिया असलेल काहीतरी असायच. आठवत नाही आता. पूजेसाठी विविध पत्री जमा करायचो आणि विशेष म्हणजे सगळी पत्री मिळायची तेंव्हा. मोठे हार करायचे, मग पुढल्या दरवाजा पासुन देवघरांपर्यत आणि अगदी धान्याच्या हडप्या पर्यंत सगळीकडे बांधायचे. त्यादिवशी किमान पाच गणपती बघायचे असा दंडक होता आणि मग आम्हा मुलांमधे कोणाकडे काय प्रसाद होता याची घरी आल्यावर उजळणी व्हायची, हे सगळ गुपचुप व्हायच. आईचे मोदक खूप चविष्ट आणि आई ऋषिची भाजी, म्हणजे आई ऋषि पंचमीला उकडुन भाज्या करायची. त्यां खाण्यासाठी आमचा जीव जायचा कारण त्यां थोड्या प्रमाणात केल्या जायच्या आणि म्हणुन चविष्ट व्हायच्या. पडवळ डाळीम्ब्या भाजी म्हणजे जीव की प्राण आणि गणपतीत ह्या भाज्या विशेष चविष्ट लागायच्या. का कुणास ठाऊक पण नंतर कधीही ती चव लागलीच नाही. आणि पु ल म्हणतात तसे गणपतीत आरत्या म्हणजे आनंदाचा गाभाच आणि त्यानंतरची पुष्पांजलि म्हणजे पराकोटीचा आनंद.

पाच दिवस रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची सागरसंगीत पूजा म्हणजे आम्हा मुलांसाठी पर्वणीच, दादांचा म्हणजे माझ्या बाबांचा एक नियम होता, दारात भरपूर फुलं आहेत म्हणून ओरबाडू नका, फुलं झाडावर राहुदे, तरच फुलपाखरं, मधमाश्या, चतुर हे तुमच्या बागेत येतील, आणि पूजेचे तबक छान सुटसुटीतच हवे. दुर्वा तुळशी कश्या व्यवस्थित मांडून ठेवा, असा सारखा घोषा असायचा बाबांचा. गणपती विसर्जन म्हणजे आनंदमिश्रित दुःखाचा दिवस. बाबांनी विसर्जनासाठी मूर्ती ओटीवर आणली की आम्हा मुलांना रडू कोसळायचे. खरं सांगू, या वर्षी मी बाप्पाची उत्तर पूजा केली आणि तुम्हांला सांगतो, मला रडु आवरेना.

हम्म, कधी कधी मन लहान मूल होतं आणि पार मागे गावात जाऊन रमतं, मग आठवणी भेंडोळ्यासारख्या उलगडत जातात. मन अगदी इवलं इवलं होतं.

पण अडेलैड सार्वजनिक गणेशोत्सवामुळे हे बालपण पुन्हा जगायला मिळाले. धन्यवाद ASGS

प्रविण भुस्कुटे  
Gaonkar Family
 तळकोकणातील सण -माझ्या डायरीतुन...

चैत्र प्रतिपदेला साजरा होणारा गुढीपाडवा झाला की तळकोकणात म्हणावा असा एकही मोठा सण पुढचे ३-४ महिने नसायचा. म्हणुनच मालवणी मुलखात " गुढीपाडवो, सगळ्या सणांच्या येता आडवो " अशी म्हण असायची. वैशाख, जेष्ठ व आषाढ हे महिने मुलांच्या परीक्षांचे व शेतकऱ्यांच्या शेतीच्या मशागतींचे असल्यामुळे प्रत्येकजण गडबडीत असल्यामुळे सणा-समारंभाकडे कोणाचं लक्षही नसायचं. जेष्ठात येणाऱ्या वटपौर्णिमेला आमच्या आयांचे उपास असायचे व त्यानिमीत्ताने आम्हा मुलाना फणसाचे गरे, आंबे, जांभळं खायला मिळायची.

मुलांच्या परीक्षा , ऊन्हाळी सुट्टी, परीक्षांचे निकाल, नवीन पुस्तके, नवीन वर्ग,शेतकऱ्यांची शेतीची कामं यामध्ये वैशाख, जेष्ठ व आषाढ हे महिने निघून जायचे आणि चाहुल लागायची ती श्रावणाची. लहाणापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण निवांत असायचा. वातावरणही सणा-समारंभाना अनुकुल असायचे. " श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे" ही कविता बालकवीनी जणु आपल्याच गावात येउन लिहीली असावी, ही खात्री वाटणारं वातावरण सर्वत्र असायचं. आमच्या आईचे श्रावणी सोमवारचे कडक उपवास असायचे. श्रावणाच्या पहिल्याच आठवड्यात या महिन्यातील मुख्य सण " नागपंचमी" यायचा.

नागपंचमीच्या आठ दिवस अगोदरपासुनच कट्ट्याच्या ( आमचा आठवडेबाजार) बाजारात नागाच्या मातीच्या मुर्ती विक्रीसाठी ठेवलेल्या दिसायच्या व नागपंचमी आल्याची जाणीव व्हायची. नागपंचमीच्या आदल्या दिवशी आबा नागमुर्ती विकत आणायचे. आई सर्व घर शेणानं लख्ख सारवून घ्यायची व त्यावर सुरेख रांगोळ्या काढायची. एका भिंतीवर शेणानं थोडीशी जागा सारऊन आबा त्यावर नागाचे चित्र काढायचे. पुढे आम्ही मोठे झाल्यावर ते काम आमच्याकडे असायचे. नागपंचमीच्या दिवशी घरात सर्वत्र समारंभाचे वातावरण असायचे. सकाळीच सर्वांच्या आंघोळी होऊन दुपारी नागाची पुजा व्हायची. गोडधोडाचा नैवेद्य त़्याला दाखवला जायचा. दुध व लाह्यांचा प्रसाद नागोबाच्या वारुळाजवळ ठेवला जायचा व संध्याकाळी त्याचं विसर्जन केलं जायचं.

यानंतर रक्षाबंधनाचा सण असायचा. आबा आमच्यासाठी राख्या विकत आणायचे. मालवणीत राख्याना " पोवते" तर राखीपौर्णिमेला " पोवत्याची पुनाव " म्हणतात. ही पोवती ताई व बेबी माझ्या व दादाच्या हातात बांधायच्या. आबा स्वतः सुती धाग्याचे एक मोठे जानवे तयार करायचे व समअंतरावर त्याला कुंकू लावून ते देवाला वाहुन पुजा करायचे व गणपतीसाठी सुरक्षीत ठिकाणी ठेवायचे. नारळीपौर्णिमेचा सण मालवणच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर समुद्रात सोन्याचा नारळ टाकून कसा साजरा करतात त्याचं वर्णन आबा आम्हाला सांगायचे व कधीतरी आपण मालवणला ते बघायला जाऊया असं म्हणायचे.

यानंतर यायचा गोकुळाष्टमीचा सण. काही ठिकाणी दह्याची मडकी फोडून गोपालकाला साजरा व्हायचा. यादिवशी प्रत्येक घरी शेवग्याच्या पानांची भाजी व तांदळाच्या पिठाच्या पोळ्या बनवून तो नैवेध बालकृष्णाला अर्पण करायचे व नंतर स्वतः खायचे.

श्रावणात साजऱ्या होणाऱ्या या सर्व सणांच्या मालीकेपेक्षा सर्वांचे लक्ष असायचे ते गणेशचतुर्थीकडे. तसंही प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात मृगाच्या पहिल्या पावसाबरोबरच त्यांच्या लाडक्या गणरायाचं आगमन झालेलंच असतं. नागपंचमीच्या दिवशीच आबा आम्हाला सांगायचे " आजपासुन बरोब्बर एक महिन्याने गणेशचतुर्थी असेल " आणि आमचे दिवस मोजणे चालू व्हायचे.

गणेशचतुर्थी दोन आठवड्यावर येताच कट्ट्याचा बाजार हळुहळू फुलायला लागायचा. गणपतीच्या सजावटीसाठी व पुजेसाठी लागणाऱ्या वस्तु, फटाके, किराणामाल यानी सर्व दुकानं भरून जायची. गणेशोत्सवासाठी शाळानापण दहा दिवस सुट्टी असायची. हळुहळू गणपतीचा सण अगदी चार दिवसांवर यायचा व सगळ्यांची धावपळ सुरु व्हायची. लाल व पांढऱ्या रंगाच्या मातीने संपुर्ण घराचं रंगकाम केलं जायचं. गणपतीच्या भिंतीवर सुरेख चित्र काढायचे.

गणेशचतुर्थी ऊत्सवाची सुरुवात एक दिवस अगोदरच व्हायची. हरीतालीकेच्या दिवशी आईचा कडकडीत ऊपवास असायचा. यादिवशी फक्त शहाळ्याचं पाणी व केळी खाण्याची मुभा असायची. पहाटेच ऊठून आई सर्व घर शेणानं सारवून घ्यायची व त्यावर सुरेख रांगोळी काढायची. आम्ही गणपतीचं टेबल व चौरंग धुण्यास आबाना मदत करायचो.आबा सकाळी जंगलात जावून रानफुले व पाने जमा करून आणायचे. दुपारी आबा गणेशोत्सवाला लागणाऱ्या सामानाची भलीमोठी यादी बनवायचे व बाजारात जावून खरेदी व्हायची. गणेशोत्सवाचा बाजार म्हणजे जणू एक सोहळाच असायचा. गणपतीच्या प्रसादासाठी व पुजेसाठी लागणाऱ्या वस्तु, आम्हा मुलांसाठी नवीन कपडे व फटाके, लाडु, मोदक व करंज्या बनवण्यासाठी लागणारं सामान यांची खरेदी व्हायची. कोकणातलं कितीही गरीब घर असलं तरी ही खरेदी कमी - अधीक प्रमाणात व्हायचीच, त्यामुळेच की काय कर्ज काढुन सण साजरा करणे यासारख्या म्हणी कोकणी माणसाची ऊत्सवप्रीयता बघुनच तयार झाल्या असाव्या असं वाटतं.

गणेशचतुर्थीच्या दिवशी सर्वांच्या आंघोळी सकाळीच व्हायच्या. आईची स्वयंपाकघरातील धावपळ चालू असायची. आम्ही सर्वजण आबाना माटी बांधायला मदत करायचो. आंब्याच्या पानांच्या डहाळ्या, नाजुकशी हरणाची व तेरड्याची फुलं, काल जंगलातून आणलेली कांगलं, शेरवडीची पानं, काकडी, भेंडी, नारळ यांचा उपयोग करुन माटी सजवली जायची. मालवणी मुलखात या माटीला मांडी, मंडपी अशीही नावं आहेत. माटी म्हणजे गणपतीच्या मंडपाचं छत.

माटी बांधून झाली की दोन बाजुनी नवीन पडदे लावून बंद करायची. आईने समया व लामणदिवा आदल्या दिवशीच लखलखीत घासून ठेवलेला असायचा. लामणदिवा माटीला बांधला जायचा. नंतर गणपतीचं आसन तयार करायचं. चौरंगाच्या खाली आई एका सुपात सव्वाशेर तांदुळ घेवून त्यावर एक असोला नारळ ठेवायची. याला महादेव म्हटलं जायचं. आईची श्रद्धा व ठाम मत असायचं की हे महादेवाचे तांदूळ गणेशोत्सवाच्या दिवसात वाढतात. आम्ही आईला म्हणायचो, अगं आपण पुजेच्या वेळी अक्षता वाहतो ना, त्यामुळे वाढत असतील. ती आम्हाला दटावायची, म्हणायची " समजत नसेल तर बोलू नका".

घरी गणपतीच्या अागमनाची सर्व तयारी पुर्ण झाली की आम्ही गणपतीला आणायला जायचो. गणपतीच्या मुर्त्या बनवतात त्या जागेला " गणपतीची शाळा " असं म्हटलं जायचं. गणपतीच्या शाळेत आमच्या बाप्पाचा पाट एक महिना अगोदरच दिलेला असायचा. आबा आमच्या बाप्पासमोर नारळ ठेवायचे व त्याला हात जोडायचे. तोच नारळ मुर्तीकाराच्या हातात ठेवायचे व बाप्पाला घेवून आम्ही घरी यायचो. आबा कधीही मुर्तीकाराला मुर्तीची किंमत तेव्हा देत नसत तर एक दोन दिवसानंतर द्यायचे. आबा म्हणायचे" देवाची किंमत करणारे व ती देवून त्याला खरेदी करणारे आपण कोण? देव हे अनमोल आहेत."

गणपतीला घेवून आम्ही घरी आलो की आई बाप्पाचं स्वागत औक्षणाने करायची. बाप्पाला आसनावर ठेवून लामणदिवे, समया प्रज्वलीत केल्या जायच्या. आईने प्रसादाचे सर्व पदार्थ तयार केलेले असायचे. सर्व तयारी करून आम्ही भटजींची वाट बघत बसायचो. भटजीना यायला कधी कधी संध्याकाळचे चार वाजायचे. नंतरच्या काळात आमच्या परंपरागत भटजींचे निधन व चांगल्या भटजींची कमतरता यामुळे आम्हीच पुजा करायला लागलो.

गणपतीबाप्पाचे घरातील वास्तव्य, सर्वत्र दरवळणारा उदबत्त्यांचा सुगंध, मंद प्रकाशात तेवणाऱ्या समया व लामणदिवे यामुळे संपुर्ण घर प्रकाशमान असायचे. जणुकाही घरात एखादी अदृश्य शक्ती वावरतेय असं वाटायचं. " चरण शुभंकर पडता तुमचे, मंदिर बनले ऊभ्या घराचे" या काव्यपंक्तींचा प्रत्यय क्षणोक्षणी येत रहायचा. संपुर्ण घर गणेशमय व्हायचे.

गणेशोत्सवातील दुसरा दिवस म्हणजे रिषीपंचमी. मालवणी मुलखात हा दिवस गणेशाचं वाहन ऊंदराच्या मानाचा. या दिवसाला "ऊंदरबी" असं म्हटलं जायचं. ऊंदिरमामासाठी गणपतीच्या बरोबरीनेच नैवेद्य काढला जायचा व तो भाताच्या खाचरात ठेवला जायचा. गणेशोत्सवातील पाचवा दिवस हा महादेवाच्या मानाचा असायचा व या दिवशी महादेवाबरोबरच गणपतीचीही पुजा बेलाच्या पानानी केली जायची.

कोकणातला गणेशोत्सव म्हणजे उत्सवांचा राजा. कोकणातला गणेशोत्सव म्हणजे उत्साह, मजा, धमाल. या उत्सवाचा एक महत्वाचा भाग म्हणजे भजनं व अारत्या. आमच्या वाडीत तशी १०-१२ च घरं, पण कधी कधी भजनं संपवून घरी यायला पहाट व्हायची. आमच्या वाडीचं खास वैशिष्ठ म्हणजे संगीत आरत्या. आमचे आबा संगीत आरत्या खुप छान म्हणायचे. संपुर्ण आरती संग्रह त्याना मुखोद्गत असायचा. वाडीतील सर्वजण त्याना आरती म्हणण्यासाठी बोलवायचे. एक एक आरती तासभर चालायची.

भजनं, आरत्या व पुजा यामध्ये दहा दिवस कसे निघून जायचे ते समजतपण नसे. आत्ता सुट्टी संपेल, कुठेतरी कोपऱ्यात भिरकावलेलं दप्तर शोधून अभ्यास चालू होईल यापेक्षाही सर्वात जास्त काळजी, जास्त हुरहुर असायची ती बाप्पाच्या विसर्जनाची. उद्या बाप्पा आपल्या गावी निघून जातील व पुन्हा तेच निरस आयुष्य चालु होईल या विचारानी झोप पण लागत नसायची. अंथरुणावर पडल्यापडल्या तळमळ चालु असायची. मध्यरात्री कधीतरी आबा जवळ यायचे व म्हणायचे " झिला, नीज आता, बाप्पा येतलो पुढच्यावर्षी परत" व थोपटून झोपवायचे.

गणेशोत्सवाचा अकरावा दिवस... बाप्पांना निरोप देण्याचा ... पुन्हा एक वर्ष वाट बघण्याचा दिवस. घरात सकाळपासुनच धामधुम असायची. आई स्वयंपाकघरात बाप्पांच्या आवडीचे अनेक पदार्थ बनवायची. दुपारी वाडीतील सर्वाना जेवायला बोलावलं जायचं. संध्याकाळी ३-४ वाजता बाप्पांच्या विसर्जनाची तयारी चालू व्हायची. बाप्पासाठी शिधा बांधून दिला जायचा. आरती, गाऱ्हाणे व उत्तरपुजा होऊन बाप्पाची मुर्ती अंगणात आणुन घराकडे तोंड करुन ठेवली जायची व त्यानंतर विसर्जन मिरवणुक निघायची. वाडीतील सर्व गणपतींचं " गणपती बाप्पा मोरया, पुढच्यावर्षी लवकर या" च्या गजरात विसर्जन व्हायचं.

शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने गाव सोडल्याला ४० व देश सोडल्याला आता लवकरच २५ वर्षं पुर्ण होतील. या प्रदिर्घ कालखंडात एकही वर्ष असं गेलं नसेल की ज्यावेळी आम्ही साजरा केलेल्या कोकणातल्या गणेशोत्सवाची आठवण आली नसेल. दरवर्षी जसजसा गणेशोत्सव जवळ येतो, जुन्या आठवणी जाग्या होतात. मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी लपून बसलेल्या आबानी गाइलेल्या संगीत आरत्या उसळी मारून बाहेर येतात आणि ओठ नकळतच गुणगुणायला लागतात,

श्री गणराया पार्वती तनया देई मज भेटी ।

तव चरणांची देवा मजला आवड बहु मोठी ।।  
Gawde Family
 As I casually walk into Enfield community center for attending practice sessions for the upcoming Ganesha festival, I am engulfed by a wave of positivity and enthusiasm. Drum beats keep echoing, songs are being played, dance steps being practiced , skits and performances are being planned all around me.

I see young (and the not so young) men and women and kids, zealously practicing their performances. Mums and dads bring their kids for their performance practice, general chit chat goes on about the planning of the upcoming festival. I am present here in body but my mind travels thousands of kilometers and a few decades back to Ghatkopar, where I went through similar experiences during my childhood and youth.

The Ganesha festival in our Sahajivan Society was also "sarvajanik" ( meaning public or literally translated "For All"). We used to look forward to this festival eagerly every year. It used to last for five days and was a cultural and spiritual treat. We used to have many cultural events during the festival. Dances, skits, dramas, elocution competitions, fancy dress competitions (yours truly won this competition three years in a row !) . These all revolved around celebrating our beloved Bappa's festivities like Puja, aarti and other rituals.

I learnt a lot of the traditional and cultural things during this festival. We used to enthusiastically participate in all activities like bringing the Ganesha idol to our society, building the stage for the performances an, distributing flowers and prasad during and after aarti, taking part in different competitions and yes practicing and performing in dramas and skits. I cherish many memories of the Ganesha festival. We would visit different mandaps ( pandals) of other societies and see the beautiful idols and the creative and beautiful decorations. Music lighting and decorations with moving objects was a novelty then.

We also had sport competitions like carom, chess, table tennis etc and these were contested with great spirit by one and all.

Eventually on day five we would have the "Ganesha Visarjan" ( immersion in water) when Bappa would leave us to come back again next year. With teary eyes we would bid adieu to Bappa, however at the same we enjoyed dancing all the way on the street to the nearest lake where the immersion took place.

So what does it mean to me now. I think the festival played a big role in my personal development . It helped me get rid of stage fear, it taught me how to speak and perform on a stage in front of an audience, it taught me cultural practices and most importantly it gave important lessons in courtesy and teamwork. Ganesha festival was a very influential factor in making me the person I am today and this is true for millions of people.

Adelaide Sarvajanik Ganeshutsav (ASG) is doing the same for many kids and youth in Adelaide. It is very significant as this is happening away from our motherland. It is helping our kids and youth learn and identify with their culture and traditional roots and instills pride in them about the same. Lokmanya Bal Gangadhar Tilak started this cultural and social festival in Pune to bring people together and create awareness among them. Today in Adelaide ASG is creating an awareness of a different kind helping foster our great culture in our young generation.

When one reminisces about old times they end up with a cliché. "Those were the days my friend…". I will however sign off with "These are the days my friend ..."

Ganpati Bappa Morya !!! 
Scroll Up